राजीव सातव यांची प्रकृती नाजूक, त्यांच्यात नवा व्हायरस सापडला; टोपेंची माहिती

Rajiv Satav - Rajesh Tope

जालना : काँग्रेसचे (Congress) खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवीन व्हायरस आढळला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज दिली. सातव यांची प्रकृती सध्या स्थिर असून, उद्या रविवारी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. महत्त्वाचं म्हणजे राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी नवी माहिती दिली आहे.

टोपे यांनी सांगितलं की, राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस आढळून आला असून, उपचार करणाऱ्या डॉक्टरशी आपण संपर्कात आहोत. राजीव सातव यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ते बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस आढळून आला. त्यांच्यावर उपचार सुरू असून शरीरात इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण डॉक्टर पूर्णत: प्रयत्न करत आहेत, काळजी घेत आहेत. सर्वकाही उपचार केले जात आहेत. तज्ज्ञातले तज्ज्ञ डॉक्टर बोलावून आपल्या मराठवाड्यातील या सुपुत्रावर उपचार केले जात आहेत. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सातव यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी स्वत: उद्या त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : कोरोनामुक्त झालेल्या राजीव सातव यांची प्रकृती खालावली,पुन्हा व्हेटिंलेटरवर ; बाळासाहेब थोरात यांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button