आवडता नेता शरद पवार सांगितल्यानंतरही सोनिया गांधींनी केली होती राजीव सातव यांची निवड

Sharad Pawar - Rajiv Satav - Sonia Gandhi - Maharashtra Today

सातारा :- काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे आज पहाटे पुणे येथे कोरोनाने निधन झाले. त्यांचे परिचित त्यांच्या आठवणी सांगत आहेत. अशीच एक आठवण किवळच्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष संगीता साळुंखे यांनी सांगितली. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी सातवांना प्रश्न विचारला होता – तुमचा आवडता नेता कोण? सातवांनी उत्तर दिले – शरद पवार (Sharad Pawar).

घटना अशी – युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी मुलाखत घेत होत्या. राजीव सातव यांना सोनियाजींनी प्रश्न विचारला, “तुमचा आवडता नेता कोण?” राजीव सातवजींनी उत्तर दिले, “शरद पवार.”

मुलाखत झाली. राजीव सातवांना वाटले आता आपली निवड होणार नाही. पण, सोनिया गांधींनी राजीव सातव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांची निवड केली. काही दिवसांतच राजीव महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त ; शरद पवारांनी जागवल्या राजीव सातव यांच्या आठवणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button