करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे : लालाच्या नातवाचा दावा

मुंबई :- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट घेतली होती, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर राऊत यांनी आपले विधान मागे घेतले. मात्र करीम लालांची भेट के‍वळ इंदिरा गांधीच नव्हे तर माजी पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंनीही घेतल्याचा दावा करीम लालाचे नातून सलीम खान यांनी केला आहे.

सलीम खान यांनी हा दावा संजय राऊत यांच्या वक्तव्याने गदारोळ झाल्यानंतर केला आहे. राऊत म्हणाले होते की, करीम लाला यांची भेट अनेक नेते घेत होते. इंदिरा गांधी यांनी देखील करीम लालाची भेट घेतली आहे. यावर सलीम खान म्हणाले की, केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर राजीव गांधी, शरद पवार, बाळ ठाकरे या दिग्गज नेत्यांशी करीम लाला यांची भेट होत असे.

करीम लाला पठानांचे नेते होते. पठाण समुदायाला अडचण आल्यास, करीम लाला नेहमीच नेत्यांना भेटून त्या अडचणी सोडवत होते. करीम लाला यांना भेटालयला इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र त्यांची भेट दिल्लीत झाली होती. याचे फोटो आजही उपलब्ध आहेत.

सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते. या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर सलीम म्हणाले की, करीम लाला हे एक व्यापारी होते. त्यांच्या मनात पठाण समुदायासाठी आदर होता. राजकारणात जावे असे त्यांना कधीही वाटत नव्हते. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की, ते राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे पुरवतील. संजय राऊत यांच्या वक्तव्याची तोडमोड करून ते सादर केल्याचा दावाही सलीम यांनी केला.