चीनच्या निर्यात वाढीवर राजीव गांधी फाऊंडेशनने सुरु केला होता अभ्यास

मुंबई : केंद्र सरकरने परदेशी देणगीचा गैरवापर केल्याच्या आरोप नेहरू आणि गांधी कुटुंबियांवर केला आहे . केंद्रीय गृह मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून सांगितले की , चीनच्या निर्यात वाढीवर राजीव गांधी फाऊंडेशनने अभ्यास सुरु केला होता . याअंतर्गत मेक इन इंडियाचा वापर करून चीन निर्यातला प्रोत्साहन देण्यात येत होते .

सत्ताधारी भाजपा सरकारने नुकताच २००५-०६ मध्ये राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दूतावासाकडून भारत आणि चीन यांच्यात मुक्त व्यापार कराराची पैशाची रक्कम मिळाल्याचा आरोप केला.

राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) आणि राजीव गांधी विश्वस्त संस्था (आरजीसीटी) यांनी २००६-०७ ते २०१८-१९ या कालावधीत एकत्रितपणे ३२६.६८ कोटी इतका परदेशी निधी मिळाल्याचे जाहीर केले. त्यापैकी ३१६.२३ कोटी (९७ टक्के) रक्कम अमेरिकेतील रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्ट व बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन तसेच दिल्लीतील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) या संस्थांनी दिली होती.

इतर परदेशी देणगीदारांत चीनच्या दूतावासाचा समावेश असून त्यांनी २००६-०७ मध्ये या संस्थांना ९० लाख रुपये दिले होते. युरोपीय समुदायाने २००६-०७ मध्ये ३.८४ लाख देणगी दिली होती. जिनेव्हातील ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रुव्हड न्यूट्रीशन या संस्थेने २.१६ कोटी रूपये दिले होते. राजीव गांधी फाऊंडेशन व राजीव गांधी विश्वस्त संस्था यांना परदेशातून १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ७६.१२ कोटी रूपये मिळाले होते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत २५०.५६ कोटी रूपये मिळाले. या संस्थांनी २०१९-२० मधील देणग्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER