राजकीय पक्ष सुरू करणार नाही : रजनीकांत यांची मोठी घोषणा

Rajinikanth launching-political-part.jpg

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष (launching-political-party) सुरू करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता असं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये असं सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे.

रजनीकांत यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे.दरम्यान रजनीकांत यांना नुकतंच प्रकृती बिघडल्यानं हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. २७ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.