रजनीकांतने सुरु केले ‘अण्णाथे’ सिनेमाचे शूटिंग

Annaatthe

सध्या संपूर्ण देशात सगळ्यात जास्त मानधन घेणारा आणि कोट्यावधींचे फॅन फॉलोईंग असणारा अभिनेता म्हणजे रजनीकांत (Rajinikanth). रजनीकांतने जशी लोकप्रियता मिळवली आहे तशी लोकप्रियता बॉलिवुडमधीलही कोणत्या नायकाला मिळालेली नाही. या वयातही रजनीकांत पडद्यावर ज्या काही करामाती करतो ते पाहाण्यासाठी प्रेक्षक तुटून पडतात. रजनीकांतने आपला सिनेमा करावा म्हणून निर्माते त्याच्या घराबाहेर पैशांच्या थैल्या घेऊन उभे असतात. रजनीकांतचा नवा सिनेमा कधी येतो याची सगळे वाट पाहात असतात. असा हा रजनी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कालपासून म्हणजे सोमवारपासून हैदराबाद येथे रजनीकांतने त्याच्या नव्या अण्णाथे (Annaatthe) सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे.

12 डिसेंबरला रजनीकांतचा वाढदिवस होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापासून संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकारांनी रजनीकांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. रविवारी चार्टर्ड फ्लाईटने रजनीकांत हैदरबादला पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची मुलगी ऐश्वर्याही होती. फ्लाईटमध्ये फ्लाईट स्टाफने रजनीकांतचा वाढदिवस केक कापून साजरा केल्याचे व्हीडियो प्रचंड व्हायरल झाले आहेत. अण्णाथे मध्ये रजनीकांतसोबत ज्येष्ठ अभिनेत्री मीना, नयनतारा, कीर्ति सुरेश, खुशबू, प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत. कोरोनाची साथ येण्यापूर्वी म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये हैदराबादच्याच रामोजी फिल्म सिटीत या सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात आले होते. जवळ- जवळ 60 टक्के शूटिंग पूर्ण झाले होते परंतु कोरोनामुळे शूटिंग बंद करावे लागले होते. आता मात्र उरलेले 40 टक्के शूटिंग हैदराबादमध्ये एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण करण्याची योजना आखण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER