सीएए-एनपीआरबाबत रजनीकांतने मांडली ठाम भूमिका

Rajinikanth backs Modi govt on CAA

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतने आज बुधवारी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीबाबत (एनपीआर) ठाम भूमिका मांडली.

सध्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर या मुद्द्यांवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेले असतानाच, रजनीकांतने या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे, हे विशेष!

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिमविरोधी नाही, असे रजनीकांतने आज आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना सांगितले.

माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाला, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा आपल्या देशातील कुठल्याही नागरिकावर परिणाम होणार नाही. सीएएचा, जर देशातील मुस्लिमांवर परिणाम होणार असेल वा त्यांना फटका बसणार असेल तर, त्यांच्या बाजूने उभा राहणारा मी पहिला व्यक्ती असेन! फाळणीनंतरही जे मुस्लिम भारतातच थांबलेत, त्यांना देशाबाहेर कसे घालवता येईल? असा सवाल त्याने यावेळी केला.

यावेळी बोलताना त्याने ‘एनपीआर’चे समर्थन केले. देशाबाहेरील नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनपीआर आवश्यक आहे, तर एनआरसीबाबत अद्याप अंतिम स्वरूप ठरविण्यात आलेले नाही, याकडेही रजनीकांतने लक्ष वेधले.

आमची सत्ता असेपर्यंत राज्यात सीएए आणि एनआरसी लागू होऊ देणार नाही – अजित पवार