राजगृह तोडफोडप्रकरण : विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे तीव्र निषेध

औरंगाबाद :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानाची दोन माथेफिरूंकडून  तोडफोड करण्यात आली. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. या माथेफिरूंना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी विविध पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने निषेध करण्यात आला. शिष्टमंडळाने बुधवारी (८ जुलै) जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन देऊन चौकशी करून हल्लेखोरांना कडक शिक्षा करण्याची मागणी केली. निवेदनानंतर भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष मोहम्मद हशीम उस्मानी, डॉ. पवन डोंगरे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, संजय वाघमारे आदी उपस्थित होते.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी

राजगृहावरील हल्ल्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने राष्ट्रीय महामंत्री अॅड. जे. के. नारायणे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच या हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

रिपब्लिकन सेना

रिपब्लिकन सेनेच्यावतीने राजगृहावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. रिपब्लिकन सेनेच्यावतीने ८ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER