किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो; भाजप नेत्याची टीका

Rajesh Tope - Atul Bhatkhalkar

मुंबई : विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप (BJP) नेत्यांनी निषेध केला आहे . भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत राजेश टोपेंवर टीका केली आहे.

भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा. त्यांच्या दुर्दैवी नातेवाइकांसाठी दुःख तरी व्यक्त करा. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो, अशा शब्दांत भातखळकर यांनी टोपेंच्या वक्तव्याचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button