राज्यात आणखी 15 दिवसाने लॉकडाऊन वाढणार; राजेश टोपेंनी दिले संकेत

Rajesh Tope

मुंबई :- राज्यात कोरोना संकटाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली .

राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेले पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले .

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वर्ध्यात म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन्सचं उत्पादन सुरू केल्याने त्यांनी गडकरींचं अभिनंदन केलं. त्यामुळे महाराष्ट्राला (Maharashtra) मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन्स मिळतील, असंही ते म्हणाले.

एकूण 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असं ते म्हणाले. तसेच म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा (Mucormycosis Injection) तुटवडा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button