लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिले हे संकेत

Rajesh Tope-Maharashtra Lockdown

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या कमी होताना दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाचे संकेत दिले.

कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाही. तर, टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. त्यामुळए राज्यातीन नागरिकांना दिलासा मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय़ घेतले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button