राज्यात फटाक्यांवर बंदी? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

Rajesh Tope - Fire Crackers

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरोग्य विभागाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आपण आग्रही असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दिवाळी तोंडावर आलेली असताना यावेळी आपल्याला फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल, ही मानसिकता आत्तापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा मी याबाबत आग्रह धरणार आहे. फटाक्यांच्या धुरामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात, थंडीमुळे हे वायू वर जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकते, असे टोपे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER