मुख्यमंत्र्यांनी थेट पक्षात घेतलेले मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम कोण ?

Rajesh Kadam & Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेनेने आगामी कल्याण-डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने (Shivsena) मनसेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

कल्याण डेंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे संस्थापक सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राजेश कदम यांच्यासोबत दीपक भोसले, सागर जेढे, कल्याण ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवबंधन बांधल्याने, मनसेला मोठा धक्का बसला. राजेश कदम हा चर्चेत असणारा चेहरा आहे. सत्ताधाऱ्यांवर नेहमी आसूड ओढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. राजेश कदम यांनी 2009 मध्ये डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविली होती. 2015 मध्ये महापालिका निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेला नेहमी धारेवर धरणारे नेते अशी राजेश कदम यांची ओळख.

राजेश कदम यांच्या प्रवोशामागे खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी आहे. त्यांनी विरोधी पक्षातील बडा नेता फोडून, मनसेची हवाच काढल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत आहे. जितके कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहे ते मनसेचे कट्टर कार्यकर्ते होते, स्थापनेपासून ते मनसेत होते. मात्र आता हेच कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने, मनसेला मोठा धक्का आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER