राजेश चौहानचा ‘हा’ विक्रम भल्याभल्यांनाही जमलेला नाही

Rajesh Chauhan

क्रिकेटपटू राजेश चौहान (Rajesh Chauhan) आता फारसा कुणाला आठवतही नसेल. आठवण रहावी अशी त्याची कारकिर्दही नव्हती. 21 कसोटीत (Test Cricket) 47 बळी आणि 35 वन डे सामन्यात 29 बळी अशी त्याची कारकिर्द. हा आॕफ स्पीन गोलंदाज अनिल कुंबळे व वेंकटपती राजू यांच्यासोबत भारताच्या फिरकी त्रिकुटात होता पण लक्षात रहावे असे काही त्याचे यश नव्हते.

असे असले तरी केवळ भारतीयच नाही तर जगातील भारीत भारी क्रिकेटपटूच्या नावावर नाही असा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो म्हणजे हा गडी पराभव न पाहता सर्वाधिक कसोटी सामने खेळलेला आहे. किती? …तर 21 सामने!

1993 ते 1998 दरम्यान राजेश चौहान जे 21 कसोटी सामने खेळला त्यापैकी एकही सामना भारतीय संघाने गमावला नव्हता. 12 सामने भारताने जिंकले होते तर नऊ अनिर्णित राहिले होते. गमावला मात्र एकही नव्हता.

त्याच्याआधीचा विक्रम आॕस्ट्रेलियन लेगस्पिनर काॕलिन मॕक्कूलच्या (Colin McCool) नावावर होता. त्यांनी 1946 ते 1950 दरम्यान खेळलेल्या 14 कसोटींपैकी एकही सामना आॕस्ट्रेलियाने गमावला नव्हता.14 पैकी 10 सामने जिंकले होते.

वेस्ट इंडिजच्या एल्डीन बाप्टीस्टचा (Eldine Baptiste) विक्रम तर खासच आहे. हा गडी 10 कसोटी सामने खेळला आणि ते सर्वच्या सर्व सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. आपण खेळलेले सर्वच कसोटी सामने जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER