दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर मंत्रीपदाची मिळाली संधी :- राजेंद्र पाटील -यड्रावकर

सांगली :- सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून दोन पिढ्यांचा संघर्ष करताना तब्बल पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर राजकारणात आता आपल्याला संधी मिळाली आहे. समाजातील सामान्य माणसाला उभे करण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हे मिळाले असल्याने सामान्यांशी जुळलेली माझी नाळ तुटणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रारावकर यांनी शनिवारी सांगलीत दिली.

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मंत्री पाटील-यड्रावकर यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला . संस्थेच्या कस्तुरबाई वालचंद कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक‘म झाला. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून निवडून आल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांचाही सत्कार करण्यात आला.

मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण क्षेत्रातील महत्वाची संस्था आहे. या संस्थेची व्याप्ती आणखी वाढविण्याची गरज आहे. संस्थेला आमचे नेहमीच सहकार्य आहेच, यापुढील काळातही ते राहणार आहे. वर्षाला पन्नास टक्के इंजिनिअरींगची कॉलेजेस बंद पडत आहेत. निम्म्याहून िअधक जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन नव्या गोष्टी करणे आवश्यक आहे. यावेळी माजी खासदार आवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक‘मास पी. आर. पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, संस्थेचे सचिव सुहास पाटील, शांतिनाथ कांते यांच्यासह संस्थेच्या विविध कॉलेजेसचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.