शिवसेनेत शोककळा : माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे कोरोनाने निधन

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे (Kalyan – Dombivali Municipal Corporation) माजी महापौर व नगरसेवक राजेंद्र देवळेकर (Rajendra Devalekar)  यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते त्यातून बरेही झाले होते. पण या दरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

देवळेकर यांच्या जाण्याने कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER