राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे ह्रदयविकाराने निधन

नागपूर : भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे यांचे आज दि.१९ ऑगस्ट रोजी दु.३.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५१ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी इंदिरा राजे भोसले, दोन मुली (अग्रेजा राजे भोसले, संयुक्ता राजे भोसले), तीन बहिणी, एक भाऊ (राजे मानसिंग भोसले), असा बराच मोठा आप्त परिवार आहे. ते शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते. नागपूरच्या मॅस्कॉट होंडा कंपनीचे ते मालक होते. उद्या राविवार दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भोसले राजवाडा, महाल येथून अंत्ययात्रा निघेल. लक्ष्मणसिंग राजे भोसले यांच्या पार्थीवावर नवी शुक्रवारी येथील काशीबाई राजघाट येथे अंत्यसंस्कार होईल.

राजे लक्ष्मणसिंग भोसले माजी खासदार राजे तेजसिंगराव भोसले व माजी खासदार चित्रलेखताई भोसले यांचे जेष्ठ चिरंजीव आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे जावई होते.