आशा राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला जिंकणे आवश्यक; राजस्थानसमोर मजबूत मुंबईचे आव्हान

RR VS MI

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने रविवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध दमदार कामगिरी सुरू ठेवू इच्छित आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघाला स्पर्धेत टिकण्यासाठी या सामन्यात विजय नोंदवणे आवश्यक आहे. राजस्थानची सर्वांत मोठी चिंता ही शीर्ष क्रमाची कामगिरी आणि ११ सामन्यांत २६५ धावा करणारा कर्णधार स्टिव्ह स्मिथचा फॉर्म नाही.

या संघात बेन स्टोक्स, संजू सॅमसन आणि जोस बटलरसारखे महान खेळाडू आहेत; पण तिघेही एकत्र कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. अष्टपैलू राहुल तेवतियाने फलंदाजी व चेंडू या दोहोंसह चांगली कामगिरी केली. गोलंदाजीतही सातत्य नसते. फक्त जोफ्रा आर्चर (१५ विकेट) त्याच्या वेगवान गोलंदाजीने प्रभावी ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध १० गडी राखून विजयासह मुंबईने एकतर्फी विजय मिळवला होता तर मागील सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पंजाबकडून पराभव पत्करला होता.

दुसरीकडे, राजस्थान हैदराबादकडून मागील सामन्यात आठ गड्यांनी पराभूत झाले होते. मुंबई इंडियन्स प्ले ऑफवर पोहचण्याच्या मार्गावर आहेत; परंतु स्नायूच्या दुखापतीमुळे चेन्नईविरुद्ध न खेळलेल्या रोहितला या सामन्यासाठी संधी उपलब्ध होईल का, असा प्रश्न निर्माण होईल. शुक्रवारी चेन्नईविरुद्ध रोहितची अनुपस्थिती जाणवली नाही; कारण युवा ईशान किशनने नाबाद ६८ धावा केल्या.

क्विंटन डिकॉकनेही नाबाद ४६ धावा केल्या. रोहित उपलब्ध नसेल तर हे दोघे पुन्हा डावाची सुरुवात करतील. सूर्यकुमार, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड हे सर्व मुंबईच्या मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहेत.

दोन्ही संघ

राजस्थान रॉयल्स :
स्टीव स्मिथ (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), संजू सॅमसन , जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, डेविड मिलर, अंकित राजपूत, महीपाल लोमरोर, मनन वोहरा, रियान पराग, मयंक मारकंडे, श्रेयस गोपाल, वरुण आरोन, जयदेव उनादकत, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशेन थॉमस, एंड्रयू टाई, राहुल तेवतिया, शशांक सिंह, यशस्वी जायसवाल, अनिरुद्ध जोशी, टॉम करन आणि अनुज रावत.

मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टिरक्षक), दिग्विजय देशमुख, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पंड्या, शेरफीन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मैकक्लेनाघन, प्रिंस बलवंत राय, अनुकूल रॉय, ईशान किशन, धवल कुलकर्णी, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, नाथन कूल्टर-नाइल आणि जेम्स पॅटिंसन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER