राजस्थान रॉयल्सची कोरोना लढ्यासाठी साडेसात कोटींची देणगी

Rajasthan Royals - Coronavirus

कोरोनाच्या (Corona) संकटात खेळल्या जाणाऱ्या आयपीएलविरोधात वाढती नाराजी असताना आणि आयपीएल (IPL) फ्रँचाईजी कोरोनाग्रस्तांसाठी काहीच मदत करत नसल्याची ओरड असताना राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी गुरुवारी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या देणगीची घोषणा केली आहे. या निधीतून प्राधान्याने राजस्थानला पण देशभर कोविडग्रस्तांवर उपचार करण्यात यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

राजस्थान रॉयल्सचे मालक, खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाने मिळून ही मदत जाहीर केली आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सची समाजसेवी संस्था रॉयल राजस्थान फाउंडेशन (RPF) आणि ब्रिटिश एशियन ट्रस्ट (BAT) यांच्या मदतीने मदतकार्य करत आहे.

ब्रिटिश एशियन ट्रस्टचे भारत सरकारसोबत कौशल्य विकास आणि शिक्षणाच्या क्षेत्रात बरेच उपक्रम आहेत. प्रिन्स चार्ल्स हे या ट्रस्टचे संस्थापक असून त्यांनी ऑक्सिजन फॉर इंडिया असे एक तातडीचे आवाहन केले आहे. त्याच्या माध्यमातून ऑक्सिजन काॕन्सन्ट्रेटर मिळवणे आणि त्यांच्या वितरणासह शिवाय थेट हवेतून ऑक्सिजन मिळवणारी यंत्रे या क्षेत्रात ते कार्य करतात. याद्वारे दवाखान्यातील रुग्णांची ऑक्सिजनची
गरज भागविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button