IPL 2020 KXIP vs RR: राजस्थान रॉयल्सने विजयासह मोडले हे ३ विक्रम

Rajasthan Royals

आयपीएल २०२० (IPL 2020) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने लक्ष्याचा पाठलाग करत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा स्वतःचा १२ वर्षाचा रेकॉर्ड मोडला.

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात धावांच्या सर्व जुने विक्रम तोडताना दिसत आहे. पहिल्या दीड आठवड्यात, डझनभर जुने रेकॉर्ड्स नष्ट झाले आहेत. परंतु रविवारी रात्री, विक्रम मोडण्यात पुढे निघाले. राजस्थान रॉयल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात अशी अनेक विक्रम मोडली आहेत जे आजपर्यंत मोडल्या गेली नाही. अशा चार विक्रम विषयी बोलूया.

सर्वात मोठा विजयचा स्वतःचाच विक्रम मोडला

राजस्थान रॉयल्सने २२४ धावांचे लक्ष्य गाठत किंग्जविरुद्धच्या सामन्यातील सर्वात मोठ्या विजयाचा नवा विक्रम रचला. राजस्थान रॉयल्सने आयपीएल -२००८ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुध्द हैदराबाद येथे २१५ धावांचे लक्ष्य गाठले होते.

राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल) संघाचा लक्ष्य तिसर्‍या क्रमांकावर असून दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर आयपीएल -२०१७ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध २०९ धावांचे लक्ष्य गाठले होते.

शेवटच्या ५ षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

राजस्थान रॉयल्स संघाच्या राहुल तेवतियाने एका षटकात ५ जबरदस्त षटकारांच्या बदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला आणि विजयच नव्हे तर एक आश्चर्यकारक विक्रमही केला. शेवटच्या ५ षटकांत सर्वाधिक धावा केल्याचा हा विक्रम आहे. राजस्थान रॉयल्सने अखेरच्या ५ षटकांत ८६ धावा बनवून, चेन्नई सुपर किंग्जच्या ७७ धावांचा विक्रम मोडला. चेन्नई संघाने आयपीएल -२०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध बेंगळुरू मैदानावर हा विक्रम केला होता.

या आयपीएलच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा

राजस्थान रॉयल्सच्या संघानेही या आयपीएलमधील पॉवर प्ले षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला आहे. पॉवर प्लेमध्ये राजस्थानने १ गडी गमावून ६९ धावा केल्या आणि या विक्रमाची नोंद झाली. या दोन संघा पूर्वी, मुंबई इंडियन्सने या आयपीएलच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम आहे, ज्याने अबुधाबीतील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १ बाद ५९ धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER