राजस्थान पोलीसांची कोल्हापुरात कारवाई : मोस्ट वॉन्टेड गुंडाला केले जेरबंद

Arrested

कोल्हापूर : राजस्थानसह तीन राज्यात मोस्ट वाॅंटेड असलेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जर याला मोठ्या शिताफीने अटक केली. आठ दिवस रेकी करुन कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने राजस्थानच्या कमांडो पथकाने धाडसी कारवाई करत पपलाला जेरबंद केले.कोल्हापूरातील सरनोबतवाडी नजीक अटकेची कारवाई केली. राजस्थानमधील जेल फोडून पसार झालेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जरवर पाच लाख बक्षीस होते.

राजस्थानमधील कख्यात गुंड गुर्जर हा हरियाणा येथून फरार होता. त्याच्यावर राजस्थानमधील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. काही गुन्ह्यात त्याला न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. शिक्षा भोगत असतानाच तो अल्वर राजस्थान येथील जेलमधून सप्टेंबर २०१६ मध्ये जेलची सुरक्षा भेदून पळाला होता. तेंव्हा पासून राजस्थान पोलीस त्याच्या मागावर होती.

गुर्जर कोल्हापूरात असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली. तो कोल्हापूरात सरनोबतवाडी नजीक रहात होता अशी माहिती समोर आली होती. राजस्थानमधील पोलीसांचे एक पथक कोल्हापूरात दाखल झाले. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष-२६ सदस्यांच्या पथकाने सुमारे आठवडाभर कोल्हापुरात तळ ठोकला.

या पथकाने स्थलांतरित राजस्थानवासीयांकडून माहिती गोळा केली. राजस्थान पोलिसांच्या एएसपी सिद्धांत शर्मा यांच्या नेतृत्वात काम करणार्‍या या विशेष पथकाने २६ जानेवारीला घराचे व्हिडिओ व जवळील छायाचित्रे गोळा केली. वरिष्ठांना संपूर्ण माहिती पाठवून सुरक्षित कारवाईचे धोरण आखले. रणनीतीचा एक भाग म्हणून, ईआरटी कमांडो पथकाने २७ जानेवारीला मध्यरात्री इमारतीला घेराव घातला. घटनास्थळावरून पळण्याच्या प्रयत्नात पपला गुर्जर याने इमारतीच्या खाली उडी मारली. ज्यामुळे त्याच्या हात व पायाला जखम झाली. सावध आणि सतर्क कमांडोंनी त्याला घटनास्थळावर महिला साथीदार झिया उशर हीच्यासह पकडले. यापूर्वी राजस्थान पोलिसांच्या पथकाने मथुरा, कानपूर आणि गाझियाबाद येथेही छापा टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER