राजस्थान : बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच मंत्री भिडले! भांडखोरांची तक्रार करणार दिल्लीकडे

Ashok Gehlot

जयपूर : राजस्थानच्या गहलोत सरकारमधील अंतर्गत कलह वारंवार चव्हाट्यावर येत आहे. बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा (Govind Singh Dotasra) यांच्यात खडाजंगी झाली.

बोर्डाची परीक्षा घेण्याच्या निर्णयाबाबत बैठक आयोजित केली होती. सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जमले होते. मुख्यमंत्री वर्चुअल बैठकीत सहभागी झाले होते. बोर्डाच्या परीक्षांचा निर्णय झाल्यानंतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू होती. डोटासरा आणि धारीवाल यांच्यात वाद झाला. इतर मंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.

कारवाई करा, मागणी

या दोघांमधील वाद शमल्यानंतर गोविंद सिंह डोटासरा यांनी शांती धारीवाल यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्याकडे केली. ते म्हणाले की, पार्टी संघटनेच्या विषयावर काही चर्चा सुरू असेल तर अध्यक्षांना बोलू देत नाही. अशा वर्तवणुकीवर कारवाई झाली पाहिजे. डोटासरा बैठकीतून जायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढून त्यांचे म्हणणं ऐकून घेतले.

बाहेर येऊनही भिडले

कॅबिनेटची बैठक संपल्यानंतरही धारीवाल आणि डोटासरा एकमेकांशी भिडले. दोघांचा वाद इतक्या जोरात होता की सगळेच जण अवाक् झालेत. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर मंत्री एकमेकांसोबत जोरात भांडत असल्याचे पाहून सुरक्षारक्षकही चक्रावले. हे सपूर्ण प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे पोहचवले जाणार आहे, असे कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button