…पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालू : गेहलोत यांचा इशारा

Ashok Gehlot

जयपूर : राजस्थानमधील (Ashok Gehlot) गहलोत – पायलट (Sachin Pilot) सत्तासंघर्षात सध्या गेहलोत यांच्या ताब्यात शंभरपेक्षा जास्त आमदार असल्याने ते विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी घाई करत आहेत. यासाठी गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी राजभवन परिसरात धरणे दिले. राज्यपाल केंद्राच्या इशाऱ्यावरून विधानसभेचे अधिवेशन बोलावत नाहीत, असा आरोप करून गेहलोत यांनी धमकी दिली आहे की, वेळ पडल्यास यासाठी पंतप्रधानांच्या (PM Modi) निवासाला घेराव करू.

सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. पायलट आणि त्यांच्या समर्थक १८ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. ती कोंडी फोडण्यासाठी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची तयारी गेहलोत यांनी दाखवली आहे.

दरम्यान, राज्यपाल कलराज मिश्रा यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय अजून घेतला नाही. त्यामुळे गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आमदारांनी राजभवन परिसरात धरणे दिली. शनिवारी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. समर्थक आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. तिथे झालेल्या बैठकीत बोलताना गेहलोत म्हणालेत – विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटू किंवा पंतप्रधान निवासस्थानासमोर धरणे देऊ. आमदारांना कदाचित अधिक काळ हॉटेलमध्येच राहावे लागेल.

विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्यासाठी राज्यपालांवर वरून दबाव असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. त्यातून राजस्थानमधील सत्तासंघर्षामागे केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा भाजपा असल्याचा त्यांचा दावा आहे. राजस्थान मंत्रिमंडळाकडून अधिवेशन बोलावण्याची विनंती करणारा नवा प्रस्ताव राज्यपालांना पाठवला जाणार असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER