राजस्थान! मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या घरावर ईडीचा छापा

Ashok Gehlot - ED

जयपूर : राजस्थानमध्ये एकीकडे राजकीय सत्तासंघर्ष सुरू आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या(Congress) मंत्र्यांच्या घरांवर ईडीचा छापादेखील पडत आहे. ईडीकडून(ED) बुधवारी सकाळी कथित खत घोटाळा प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या घराचाही समावेश आहे.

१३ जुलै रोजी आयकर विभागाकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत(CM Ashok Gehlot) यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यांची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या घरावरच इडीने धाड टाकली आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला(Randeep Surjewala) यांनी हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला होता.

खत घोटाळ्याप्रकरणातील आरोपींचा अंमलबजावणी संचालनालय राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली येथील अनेक ठिकाणी शोध घेत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे बंधू अग्रसेन गहलोत आणि माजी खासदार बद्री राम जाखड़ यांच्या निवासस्थानी छापा इडीकडून टाकला जात आहे. असे वृत्त एएनआयने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER