राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे पुण्यात भाजपावर टीकास्त्र

पुणे :- धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट धर्माच्या आधारावर नागरिकत्व नाकारणेही चुकीचे आहे. ही गोष्ट संविधानातील कलम १४च्या विरोधात असून, धर्माच्या नावावर भाजपा देशाला विभागण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघात आज गुरुवारी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला.

ही बातमी पण वाचा : …परंतु आता सरकार आणायचं असल्यास दंगल व्हावी लागते; प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर निशाणा

पुण्यात काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. पायलट म्हणाले, केंद्र सरकारने देशभरात गोंधळ निर्माण केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे कुठल्या उद्देशाने लागू करण्यात आले, ते बघणे आवश्यक आहे. गरीब, आदिवासी, मागासवर्गीय यामध्ये भरडले जात आहेत. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी यावरून देशाचे लक्ष हटविण्यासाठी सीएए, एनआरसीसारखे प्रकार आणले जात आहेत. या नवीन कायद्यांना भाजपासोबत असणारे पक्षसुद्धा विरोध करीत आहेत. सरकारने या कायद्यांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित होते.