राजस्थान : नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची भाजपावर किरकोळ आघाडी

नवी दिल्ली :- राजस्थानमध्ये (Rajasthan) २० जिल्ह्यातील ९० नागपालिका निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली आहे. काँग्रेसनं ११९७ तर भाजपाने ११४० जागांवर विजय मिळाला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचं ट्वीट

‘काँग्रेस पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, मतदारांचे आभार, काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांचे त्यांनी घेतलेल्या परिश्रमासाठी धन्यवाद आणि विजयाच्या शुभेच्छा’, असे ट्वीट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याकडून शुभेच्छा

अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही विजयाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन केले. ‘राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या समस्त उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद. काँग्रेस उमेदवारांना मोठ्या प्रमाणात समर्थन दिलेल्या मतदारांचेही आभारट, असे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९० नगरपालिका निवडणुकीत एकूण ३०३५ ३०३४ वार्डाचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसला ११९७ भाजपाला ११४० जागांवर विजय मिळाला आहे. तर ६३४ वार्डात अपक्ष उमेदवार विजयी झालेत. ४६ वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेस, १३ वॉर्डात आरएलपी, ३ वॉर्डात सीपीआय (एम) आणि एक उमेदवार बहुजन समाज पक्षाचा निवडून आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER