राजस्थान : बारां बलात्कार कांडाच्या निषेधात भाजपाचे जयपूरमध्ये आंदोलन

Rajasthan Protest BJP

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) बारां येथील दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेच्या निषेधात भारतीय जनता पार्टीने (BJP) राजधानी जयपूर (Jaipur) येथे आज निदर्शन केले. यावेळी निदर्शक आणि पोलिसात झटापट झाली. पोलिसांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Punia) याना ताब्यात घेतले.

बारां शहरातील दोन अल्पवयीन बहिणी १९ सप्टेंबरला गावातून बेपत्ता झाल्या होत्या. त्या २२ सप्टेंबरला कोटा येथे सापडल्या. त्यांनी सांगितले की, दोन जण आम्हाला नलका रेल्वे स्टेशनवर घेऊन गेलेत. तिथून जयपूरला नेले. तिथे चार जणांनी आमच्यावर बलात्कार केला.

कोटा येथे परत आल्यानंतर आम्ही वडिलांना याची माहिती दिली. पोलिसांकडे गेलो तर त्यांनी आम्हालाच ठार मारण्याची धमकी दिली! या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केली, असा आरोप आहे. याबाबत राजस्थानमधील अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या काँग्रेस सरकारकडे काहीही उत्तर नाही.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, भारतीय जनता पातीचे सरकार असलेल्या हाथरस येथील युवतीवरील बलात्कार व हत्या प्रकरणी राहुल आणि प्रियंकासह पूर्ण काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे पण बारां प्रकरणावर ते काहीच बोलत नाहीत ! या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बारां येथे जाऊन पीडित परिवाराची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER