चेन्नईसाठी झाले प्लेऑफमध्ये पोहोचणे अवघड, राजस्थानने ७ गडी राखून केला चेन्नईचा पराभव

Rajasthan beat Chennai by 7 wickets

अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ३७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १२५ धावा करू शकले.

चेन्नईकडून रवींद्र जडेजाने ३० चेंडूंत ३५ धावांचे योगदान दिले. याशिवाय कर्णधार धोनीने २८ चेंडूत २८, सॅम कुर्रानने २५ चेंडूत २२ आणि अंबाती रायुडूने १९ चेंडूत १३ धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने ४ षटकांत १४ धावा देऊन १ गडी, राहुल तेवतियाने ४ षटकांत १८ धावा देऊन १ गडी, जोफ्रा आर्चरने ४ षटकांत २० धावा देऊन १ गडी आणि कार्तिक त्यागीने ४ षटकांत ३५ धावा देऊन एक गडी बाद केले.

चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या १० पैकी तीन सामने जिंकले आहेत, तर ७ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर राजस्थाननेही १० पैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, राजस्थान ८ गुणांसह ५ व्या स्थानावर आहे आणि चेन्नई ६ गुणांसह शेवटी ८ व्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER