राजर्षी शाहू महाराज समाधी दुसरा टप्पा सुशोभीकरण ५ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

Eknath Shinde

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण कामासाठी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. शाहू महाराजांच्या शाहू मिलमधील प्रस्तावित स्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्नही महत्त्वाचा असून त्याबाबतही सरकार सकारात्मक पावले उचलेल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर महापालिका व जिल्ह्यातील विविध नगर परिषदांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्री. शिंदे आज कोल्हापूर येथे आले होते. महापालिका मुख्यालयात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत श्री. शिंदे यांनी महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आणि रंकाळा तलाव परिसर सुशोभीकरण या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, नगरविकास विभाग सर्वतोपरी मदत करेल, असेही ते म्हणाले. या प्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, आमदार चंद्रकांत जाधव, महेश जाधव, प्रधान सचिव महेश पाठक, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER