राजर्षी शाहू महाराजांनी केली होती महाराष्ट्रातल्या पहिल्या लॉकडाऊची घोषणा !

Maharashtra Today

कोरोनाची दुसरी लाट सध्या तेजीत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन(lockdown in Maharashtra) होईल हे जवळपास निश्चित झाल्याची परिस्थीती आहे. काही ठिकाणी उद्रेक झाल्याचंही पहायला मिळतंय.कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर आणि संशयित रुग्णांनी क्वारंटाइन होणं हाच पर्याय आहे. याआधी अनेक महामारीच्या प्रसारामुळं जगभरातलले लोक क्वारंटाइन झाले होते पण पहिल्यांदा ही पद्धत २० व्या शतकात प्लेगशी सामना करताना वापरण्यात आली. तर महाराष्ट्रातलं पहिलं लॉकडाऊन राजर्षी शाहू महाराजांनी घोषित केलं होतं (Rajarshi Shahu Maharaj had announced the first lockdown in Maharashtra!).

महामारीशी लढा देणं सोप्पी गोष्ट नाही. हवेतील धुळीकण, माती, पाणी इत्यादीतून महामारीचा प्रसार होतो. कोरोनासारखा विषाणू तर स्पर्शानेही पसरतो. महामारीला आळ घालण्यासाठी क्वारंटाइन होणं हा महत्त्वाचा उपाय आहे. प्लेगमुळं अॅथेन्ससारख्या विशाल साम्राज नष्ट झालं होतं. महामारीपासून सुरक्षित बचावासाठी लस मिळेपर्यंत लॉकडाऊन आणि क्वारंटाइन हेच उपाय असल्याच दिसतं. उपाय योजनांची रणनिती आखताना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

इटलीच्या व्हेनमधून उदयाला आली संकल्पना

इतिहासात चौधाव्या शतकाच्या सुरुवातीला क्वारंटाइनची कल्पना इटलीच्या व्हेनिसमध्ये उदयास आली. पुर्वेकडील देशांकडून येणाऱ्या जहाजांचे ते प्रमुख बंदर असल्यामुळे व जहाजावरून येणाऱ्या संसर्गित मालामुळे प्लेग उद्‌भवतो अशा कल्पनेने व्हेनिशियन लोकांनी संशयित जहाजे, त्यांवरील माल व माणसे अलग ठेवण्यासाठी व सर्वसाधारण दळणवळणात मिसळू न देण्याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली.

पहिला प्रतिबंधक हुकुम

१३७४ मध्ये बेर्नाबॉ व्हिसकोंटी या मिलनच्या ड्यूकनी (सरदारांनी) प्लेग फैलाव प्रतिबंधक हुकूम काढला. त्यामध्ये प्लेगाचे रोगी गावाबाहेर शेतात नेऊन ठेवणे, तसेच प्लेगाच्या रोग्याची शुश्रुषा केलेल्या व्यक्तीने किंवा रोग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीने १४ दिवस विलग्नवासात राहण्याचा आदेश होता. हे कालमान इतरत्र हळूहळू ४० दिवसांपर्यंत वाढविण्यात आले. पुढे इटली, द. फ्रान्स व आजूबाजूच्या देशांतूनही विलग्नवासा म्हणजेच क्वारंटाइनच्या कल्पनेचा प्रसार झाला.

कोल्हापूरच्या छत्रपतींनी महाराष्ट्रात पहिल्यांदा लॉकडाऊनचे आदेश दिले होते

कोल्हापूरच्या ज्योतिबा देवस्थानची यात्रा पुर्वीपासूनच मोठी भरते. एकोणीसाव्या शतकाच्या आधीपासून लोक ज्योतीबा दर्शनासाठी मुंबई पुण्याहून इकडे येत असतं. हजारो लोक ज्योतिबाच्या दर्शनाला यायचे. १८९७ साली भारतात प्लेगच्या साथीनं थैमान घातलं होतं. त्यावेळी भारतीय आरोग्य यंत्रणा देखील सक्षम नव्हत्या. प्लेगपासून बचाव करण्यासाठी त्याचा प्रसार रोखण्यासाठी यात्रा रद्द केली. सोबतच लॉकडाऊनचे आदेशही शाहू छत्रपतींनी दिले होते. संक्रमण रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचललं गेलं होतं.

जेव्हाही क्वारंटाइनचे योग्य पालन व्यवस्थित झालं तेव्हा रोगाच्या प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवणं शक्य झालं. ऑक्टोबर १९१८ मध्ये इंफ्लुएंजा महामारीनं न्यूझीलंडला आणणाऱ्या सहा जहाजातील लोकांना व्यवस्थीत क्वारंटाइन केलं गेलं असतं तर जगभरात एड्सचा प्रसार झाला नसता. क्वारंटाइनमध्ये ढिल देण्यात आल्यामुळं एड्सच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेला एच१ एन१ विषाणू मोठ्याप्रमाणात पसरला.

सुरुवातीच्या काळात दोन देशांमध्ये आयात निर्यातीची प्रक्रिया समुद्र मार्गातून व्हायची. या प्रवासासाठी लागणारा वेळ जास्त असल्यामुळं संक्रमण आणि महामारीच्या प्रसाराची संभाव्यता अत्यल्प होती. तशी काही शंका वाटल्यास जहाजातील प्रवासी आणि नाविकांना बंदरावरच थांबलं जायचं. चाळीस दिवसांसाठी त्यांना क्वारंटाइन केलं जायचं.

इतिहासात क्वारंटाइन केल्याचे अनेक दाखले सापडतात. महामारीच्या प्रसारासाठी कडक पावलं तेव्हाही उचलली जायची. विषाणूंमुळे महामारी परसते याच ज्ञान त्यावेळी उपलब्ध नसलं तरी क्वारंटाइन आणि सोशल डिस्टंसिंग या संज्ञांचा वापर तेव्हापासून सुरु आहे. मध्ययुगात ज्या नगर अथवा खेड्यात महामारीचा फैलाव व्हायचा तेथील लोकांना बाहेर जाण्यास मनाई होती. इतर ठिकाणच्या लोकांना तिथं भेट देण्यास मनाई केली जायची. पण जेव्हा केव्हाही रोग जास्तीचा वाढायला लागायचा तेव्हा मात्र लोक शहर सोडून पलायन करायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button