माझ्या कात्रीत कोणी सुपारी देऊ नये – राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर

raj thackeray-fadnavis

मुंबई :- माझ्या कात्रीत कोणी सुपारी देऊ नये. नाहितर त्यांना पण माहिती आहे मी काय भूसा करून ठेवेन, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी म्हटलं.

राज ठाकरें सुपारी घेऊन भाषण करतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यालाच राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

माझ्यावर आरोप करण्यापेक्षा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर भाजपने द्यावी, असं खुलं आव्हान राज ठाकरेंनी दिलंं आहे.
दरम्यान, मोदी-शहा ही जोडी या देशासाठी नुकसानकारक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसंच, यावेळी बोलताना २६/११ हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा सर्वनाश मी दिलेल्या शापानेच झाला, असा दावा  प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आली होती. जामीनावर सुटलेल्यांनी अशी वक्त करताना लाज बाळगावी अशी कडाडून टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला कारागृहात जशी वागणूक दिली जाते, तशी वागणूक प्रज्ञा सिंहला मिळाली, त्यात वेगळ  अस काय झालं, असा सवाल यावेळी राज यांनी उपस्थित केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रज्ञा सिंह हिचे समर्थन करतात हे दुर्दैवी आहे. बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपींच मोदी समर्थन करत असतील तर त्यांच्या मनात, देशाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांबद्दल काय आदर आहे हे उघड झालं असही राज म्हणाले.