मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंचे ते शब्द खरे ठरले; आता पवारांनी नेमके कारण सांगावे

Raj Thackeray - Maratha Reservation - Sharad Pawar

मुंबई :- बुधवारी सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) धक्कादायक निकाल देत राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Community) दिलेले आरक्षण रद्दबातल केले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले, असा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून होत आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे राष्ट्रपतींनी आणि केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व जबाबदारी केंद्राकडे ढकलली आहे. आरक्षणाच्या या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्रात सुरू असलेल्या वादामुळे मात्र मराठा समाजाची मोठी हानी होत आहे. आणि हाच धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकेकाळी केलेले भाषण सत्यात उतरताना दिसून येत आहे. सध्या राज ठाकरेंचे हे भाषण  सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले आहे. आता केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र महाराष्ट्रात जवळपास १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते.

केंद्रातही त्यांचेच सरकार होते. मग तुम्ही मराठ्यांना आरक्षण का नाही दिले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. सर्व राजकारण्यांना केवळ निवडणुकीपुरती मराठा समाजाची आठवण येते. त्यांना मराठ्यांच्या मतांच्या भरवशावर निवडून यायचे असते. त्यांना समाजाच्या इतर प्रश्नांशी काहीही घेणेदेणे नाही. मुळात जातीच्या आधारे आरक्षण नकोच, आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी होती. जर ही मागणी मान्य झाली असती आणि आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण मिळले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र या राजकारण्यांना केवळ आपली पोळी शेकायची असल्याने आरक्षणाचा तिढा कायम आहे. मराठ्यांना आरक्षण का मिळू शकत नाही, हे सर्व राजकारण्यांना माहिती आहे. शरद पवारांना तर चांगल्यानेच माहिती आहे. आता त्यांनी यामागचं कारण स्पष्ट करावं, असे राज ठाकरे त्यावेळी बोलले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button