राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल : भाजप नेत्याचे वक्तव्य

Pravin Darekar - Raj Thackeray

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्या (Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या १ ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे . यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली आहे.

राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच वेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारेवर होत असते किंवा तशा प्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशा प्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगलं वातावरण निर्माण होईल, असं मला वाटत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER