राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर

मुंबई :- राज्यात कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च रोजी होणारा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी आमदार नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी दिली आहे. तसेच अध्यक्ष राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापनदिनापूर्वी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protest) अद्याप या दौऱ्याचं नियोजन झालं नाही. त्यामुळे राज ठाकरेंचा (Raj Thackeray) अयोध्या दौराही लांबणीवर गेला आहे.

याबाबत नितीन सरदेसाई म्हणाले की, दरवर्षी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येतो. परंतु यंदा गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. ९ मार्च रोजी राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते मनसे सदस्य मोहिमेला सुरुवात करतील, पक्षसदस्य नोंदणीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सदस्य सुरू होईल, जागोजागी नोंदणी होणार आहे. त्यामुळे गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच अद्याप राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल काही नियोजन नाही, असेही नितीन सरदेसाईंनी सांगितले.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापनदिनापूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र शेतकरी आंदोलनामुळे अद्याप या दौऱ्याचं नियोजन झालं नाही, याबाबत येत्या एक-दोन दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन तारीख ठरवली जाईल, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे मास्क घालत नाहीत,   पण… ; मनसेचा मोठा निर्णय  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER