राज ठाकरेंनी कसली कंबर ; कल्याण-डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी ‘त्रिमूर्ती’

Raj Thackeray - Kalyan-Dombivli Municipal Corporation Election

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी वैयक्तिक चर्चा केली. मनसेची गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई (Nitin Sardesai), अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि शिरीष सावंत (Shirish Sawant) या नेत्यांना कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आता नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राज ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, गळती रोखणे आणि अधिकाधिक उमेदवारांना विजयी करणे अशी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

ही बातमी पण वाचा : मनसेचे पडझडीनंतर डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER