उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचीही साथ, ‘लॉकडाऊन झाल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन’

raj thackeray and uddhav thackeray

मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा (Lockdown) मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ह्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना  फोनवरील संवादात केलं, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याला भाजपसह मनसेनंही विरोध दर्शवला आहे.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. इतकंच नाही, लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास मनसेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या  या आवाहनाला राज ठाकरेंनी तत्काळ समर्थन देत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं  आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून  राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आणि जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. ‘आपण सर्वांनी सरकारी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केलं गेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button