राज ठाकरेंची सूचना : मनसेकडून शेकडो रिक्षाचालक व घरकाम करणाऱ्या महिलांना रेशनचे वाटप

Raj Thackeray - Ration Distribution

मुंबई : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना (Corona) संसर्गाला रोखण्यासाठी ठाकरे सरकारने काही जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन (Lockdown) तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लोकांना अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबीयांना बसला आहे. रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांना माहिती पडताच त्यांनी पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशाची तत्काळ दखल घेत मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी ठाण्यातील शेकडो रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना महिनाभर पुरेल इतके रेशनचे मोफत वाटप केले.

मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्या हस्ते ठाण्यातील वाहतूक सेनेच्या रिक्षा सभासदांना व घरकाम करणाऱ्या महिलांना एक महिन्याचे मोफत रेशन वाटप करण्यात आले. राज यांचे स्वीय सचिव सचिन मोरे, वाहतूक सेनेचे जिल्हा आशिष डोके, उपशहर अध्यक्ष विश्वजित जाधव, कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे विभाग अध्यक्ष महेश कदम, महिला सेना शहर अध्यक्ष समीक्षा मारखंडे, ठाणे शहर सचिव निलेश चव्हाण, संजय म्हसे पाटील, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button