राज ठाकरेंच्या मसलमॅनचा खुलासा : कंगनाशी कौटुंबिक नातं, राजकीय संबंध जोडू नका !

Manish Dhuri & Kanagana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) पुन्हा मुंबईत आली आहे. मुंबईत पोहचताच तिने कुटुंबासह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलेय. यावेळी तिच्यासोबत राज ठाकरेंचे मसलमॅन म्हणून ओळख असलेले मनसेचे (MNS) अंबोल विभाग अध्यक्ष मनीष धुरी (Manish Dhuri) दिसलेत. यावरून पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले. त्यातच धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाशी आमचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं कौटुंबिक नातं आहे.

त्याचा राजकीय संबंध जोडू नका, अशी प्रतिक्रिया मनीष धुरी यांनी दिली आहे. मनीष धुरी यांनी काल मंगळवारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यासोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे कंगनाला शिवसेनेविरोधात बोलण्यासाठी मनसेचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चेने  जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर मनीष धुरी यांनी खुलासा केला आहे. कंगनासोबत आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे काल त्यांच्यासोबत देवदर्शनाला गेलो. त्याचा राजकीय संबंध जोडू नये, असं धुरी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत धुरी?

धुरी हे मनसेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांची मनसेत ‘मसलमॅन’ म्हणून ओळख आहे. मनसेकडून राबवण्यात येणाऱ्या खळ्ळखट्याक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. (our family relation with kangana ranaut says manish dhuri)

काय आहे प्रकरण?

कंगना काल सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रभादेवीला आली होती. मराठमोळ्या वेषात आलेल्या कंगनाने यावेळी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईत राहण्यासाठी मला बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. इतर कुणाच्याही परवानगीची गरज नाही, असं कंगनानं म्हटलं होतं. यावेळी तिच्यासोबत मनसेचे पदाधिकारी होते. मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांचे बंधू कुशल धुरी कंगना राणावतसोबत होते. कंगना सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना धुरी बंधू तिच्यासोबत असल्यामुळे मनसेकडून  कंगनाला छुपं संरक्षण दिलं जात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER