मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेना सोडून आलेल्या राज ठाकरेंच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

Raj Thackeray

नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईबाहेरील कट्टर समर्थक संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. विद्यार्थिदशेपासूनच संभाजी जाधव राज ठाकरेंच्या सोबत होते. नांदेडमध्ये जाधवं यांनी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून उत्तम काम पाहिले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर संभाजी यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि राज ठाकरेंसोबत आले. संभाजी जाधव हे मराठवाड्यातील मनसेचे पहिले पदाधिकारी होते. संभाजी जाधव यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता.

राज ठाकरेंचा कट्टर समर्थ असणा-या जाधव यांनी असं टोकाचं पाऊल उचलावं यासाठी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. परंतू, जाधव यांच्यावर शेतीवरील कर्जाचा डोंगर वाढला होता. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी आत्महत्ये केल्याचे कळते. 2006 मध्ये शिवसेना सोडून राज ठाकरेंसोबत जाणारे संभाजी जाधव हे मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी होते.

ही बातमी पण वाचा : सत्ता असो वा नसो दोनच पक्ष चर्चेत एक राष्ट्रवादी तर दुसरा मनसे : सुप्रिया…

म्हणजे राज ठाकरे यांचे स्वतः संभाजी जाधव यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. संभाजी जाधव पदावर असो अथवा नसो राज ठाकरे नांदेडला आले की संभाजी जाधव यांची भेट ठरलेली असे. संभाजी जाधव हे नांदेडजवळच्या डौर गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. ते स्वतः नांदेड शहरातील तरोडा नाका भागात राहत असत. याच घरात मध्यरात्री त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. गेल्या चार वर्षांपासून कायम दुष्काळी स्थिती असल्याने शेतीचं कर्ज वाढलं होतं. त्यातून हतबल झाल्याने संभाजी जाधव यांनीआत्महत्येचा मार्ग स्विकारला. या घटनेमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मनसैनिकाने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे.