राज ठाकरेंचा ‘मराठी अजेंडा’ पालिका निवडणुकीत मतं मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल ?

मुंबई :- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha and Assembly elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सध्या चांगलीच चर्चेत आहे. मनसेची ‘मराठी बोला, मराठीत व्यवहार करा’, ही चळवळ ही चळवळ कधी नव्हे इतकी यशस्वी ठरताना दिसत आहे. मनसेच्या दणक्यापुढे अ‍ॅमेझॉनसारख्या (Amazon) बलाढ्य कंपनीलाही हारमानावी लागली .

अ‍ॅमेझॉनची ही गत पाहून स्विगी, डॉमिनोज यासारख्या फूड चेन्स असणाऱ्या इतर कंपन्यांनीही आपल्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरु केल्या.

कोरोनाच्या (Corona) काळात सामान्य नागरिक, व्यापारी आणि अनेक व्यावसायिक शिष्टमंडळांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले होते. या सगळ्याची तेव्हा बरीच चर्चा झाली, पण कालांतराने ती विरुनही गेली. परिणामी त्यामधून मनसेला म्हणावा तसा राजकीय लाभ झाला नव्हता. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर अ‍ॅमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीला नमते घ्यायला लावल्याने हे आंदोलन मनसेला ग्रामपंचायत निवडणुकीत नक्कीच यश मिळवून देण्यास मदत करेल .

तसेच येत्या काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या या यशस्वी आंदोलनाचे टायमिंग मनसेसाठी निर्णायक ठरू शकते. विधानसभा निवडणुकीनंतर मनसेने आपला झेंडा आणि अजेंडा बदलला होता. आगामी काळात हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका वगळता राज ठाकरे यांची मनसे फारशी चर्चेत आली नव्हती. तर दुसरीकडे मनसेने मराठीच्या मुद्दा सोडल्याची चर्चाही सुरु झाली होती. मात्र, अ‍ॅमेझॉनविरुद्धच्या आंदोलनामुळे मनसेने आपण मराठीच्या अजेंड्यावर अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले. पालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेला याचा फायदा होऊ शकतो, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंसोबत ‘नो पंगा’, डॉमिनोजने मनसेच्या मागणीची घेतली तात्काळ दखल; लवकरच मराठीत अप्लिकेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER