राज ठाकरेंना उत्तर भारतीयांचीही साथ; ५०० वर उत्तर भारतीय मनसेत

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कंबर कसली आहे. त्यातच आता मनसेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंगही वाढले आहे. आज वसई, विरार भागातील ५०० वर उत्तर भारतीयांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. सोबतच ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांना जोरदार झटका दिला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. मुंबईतील चांदिवली विधानसभेतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

ठाणे आणि वसई विरारमधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा रंगली.

तसेच जुन्या नांदेडमधल्या शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) असलेल्या युवकांनी दोन दिवसांपूर्वी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार आहे. मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER