राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

Raj Thackeray

मुंबई :- राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मंगळवारी मनसेची (MNS) महत्त्वाची बैठक होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी बोलावले आहे. साधारण सकाळी 10 वाजता राज ठाकरे वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. यावरून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने नुकताच राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांची झेड (z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना कार्यकर्ते हेच कवच, मनसे नेत्या रुपाली पाटील ठाकरे सरकारवर भडकल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER