राज ठाकरेंची वाढती लोकप्रियता ‘ठाकरे’ सरकाराच्या जिव्हारी, दिला हा आदेश

Uddhav Thackeray-Raj Thackeray

मुंबई :- मागील काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे. इतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच सामान्य लोकही मनसेला जोरदार समर्थन देत आहे. राज ठाकरेंबाबत लोकांची वाढत असलेली लोकप्रियता ‘ठाकरे’ सरकारच्या (Thackeray government) जिव्हारी लागली आहे. त्यांची ही लोकप्रियता कमी करण्याचा घाट आता ठाकरे सरकारने घातला आहे.

राज ठाकरे हे सत्तेत नसले तरीही मुंबईतील अनेक कामे ते आपल्या स्वखर्चाने करत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अश्या कामांना ब्रेक लावण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांच्याद्वारे स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज पार्कला करण्यात येणारी विद्युत रोषणाई थांबवण्याचा घाट घालण्यात आला आहे. तसे आदेशही सरकारने जारी केले आहेत. याबाबत मनसेचे नेते संदीप जाधव (Sandeep Jadhav) यांनी माहिती दिली.

दर वर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा म्हणून राज ठाकरे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park) ला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय राज ठाकरे आणि मनसेला मिळू नये म्हणून जनतेच्या पैशातून वर्ष भर रोषणाई करण्याचा घाट घातला जात आहे. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होते का? आणि खरोखरच करायचं आहे तर जनतेच्या पैशातून का ? असा प्रश्न उपस्थित करुन महिन्याला येण्याऱ्या “कलेक्शन” मधून करा. तुम्हाला शुभेच्छा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचे ‘ते’ १० प्रश्न; उद्धव ठाकरे सरकार उत्तर देणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER