सुशांत सिंह राजपूत आत्महत्या वादावर राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackerayh-Sushant Singh Rajput

मुंबई : सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरुन हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ही बातमी पण वाचा : … ‘ती ‘पक्षाची अधिकृत भूमिका नाही : अमेय खोपकर

“सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद”, असे राज ठाकरे ठाकरे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER