राज ठाकरेंचा गौप्यस्फोट : अतुल भातखळकरांनी मागितले होते मनसेचे तिकीट

atul bhatkhalkar - raj thackeray - Maharastra Today

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे तिकीट मागितले होते, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते एका वेबिनारमध्ये बोलत होते.

२००९ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे अतुल भातखळकर यांनी माझ्याकडे मनसेचे तिकीट मागितले होते. मी नितीन गडकरींना फोन करून त्यांची समजूत काढली. असे करू नका; ज्या पक्षात आहात त्यातच काम करत राहिले पाहिजे असे सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.

आजवर अनेक नेते मनसेला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले, याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सध्याचे भाजपाचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचे तिकीट मागितले होते याची माहिती दिली.

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबद्दल राज ठाकरे म्हणालेत की, मनसेला नेते सोडून गेले असे अनेकदा सांगितले जाते. पण जे सोडून गेले त्यांचे फक्त एका बातमीशिवाय दुसरे काही झाले का? मला एक असे उदाहरण दाखवून द्या, माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपामध्ये गेलेत, त्यांचे काय झाले?

Source:-Daily Hunt

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button