राज ठाकरेंचे आवाहन; मुख्यमंत्री निधीत मानधन जमा करण्याची नांदगावकर यांची घोषणा

Maharashtra Today

मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी राज सरकारला मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागत आहे. एकीकडे महसुलात मोठ्याप्रमाणात तूट निर्माण झाली असताना दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी सरकारला पैश्यांची चणचण भासू लागली आहे. राज्याची आर्थिक स्थिती बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांना जमेल ती मदत सरकारला करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, मनसैनिकांकडून मदत पुरवली जात आहे.

आता मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार म्हणून मिळत असलेले मानधनमुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे माजी आमदार म्हणून मिळत असलेले मानधन मुख्यमंत्री सहायता निधी ला देण्याची इच्छा दर्शविली. हे इथे शेयर करण्याचे कारण कोणताही बडेजाव व्हावा म्हणून नव्हे तर आपण सर्वांनी यथाशक्ती या कठीण समयी मदतीचा हात पुढे करावा यासाठी ही पोस्ट करीत आहे. ही केलेली विनंती म्हणजे “फुल न फुलाची पाकळी” अशी आहे, असे म्हणत त्यांनी आपले मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button