राज ठाकरेंचे ‘ते’ १० प्रश्न; उद्धव ठाकरे सरकार उत्तर देणार का?

RAj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी काल थेट राज्याचे (Raj Thackeray) गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . त्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. आज मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले. तेसच, केंद्राने यात हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी, अशी मागणीही केली.

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दरमहिन्याला १०० कोटींची वसुली करण्यास सांगितलं होतं, असं सिंग यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केलेत. तसेच, त्यांनी अनेक सवालही यावेळी उपस्थित केलेत.

राज ठाकरेंचे १० प्रश्न

  • गाडीत जिलेटीन ठेवले पण ते जिलेटीन आले कुठून?
  • परमबीर सिंग यांना पदावरून का हटवलं?
  • परमबीर सिंग दोषी होते तर मग त्यांना निलंबित करून चौकशी का नाही केली?
  • शिवसेना पक्षात वाझेला कोण घेऊन गेलं होतं?
  • अंबानींच्या घराखाली वाझे कुणी सांगितल्याशिवाय गाडी ठेवेल का?
  • बॉम्ब ठेवण्याचं धाडस, कुणाचा तरी आदेश असल्याशिवाय पोलीस करतील का?
  • नीता भाभी आणि मुकेश भैय्या? बॉम्बची धमकी देणारा आदर करतो का?
  • अंबानींकडून पैसे काढणं सोपं आहे का?
  • बरं ज्या अंबानींचे मुख्यमंत्र्यांसोबत मधुर संबंध आहेत, तिथं पोलीस पैसे मागायला जातील का?
  • कुणाच्या सांगण्यावरून गाडी तिथं ठेवली गेली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER