श्रीकांत दातार यांना राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

Raj Thackeray-Shrikant Datar.jpg

मुंबई : भारतीय वंशाचे श्रीकांत दातार (Shrikant Datar) यांची अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ‘डीन’ म्हणून निवड करण्यात आली आहे. दातार यांचे अभिनंदन करताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले – जगातील मराठी जनांना आणि मला दातार यांच्या नियुक्तीने अत्यानंद झाला असून ही अभिमानाची बाब आहे.

असेच दिमाखात मराठी पाऊल पुढे पडत राहो, मनापासून आपले अभिनंदन, ते भारतीय वंशाच्याच नितीन नोहरिया  यांची जागा घेतील. १ जानेवारी रोजी पदभार स्वीकारतील. राज म्हणाले – परदेशात, विशेषत: हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी देशातील असंख्य मराठी तरुण धडपडत आहेत. त्यावेळी, या विद्यापीठाचे प्रमुख मराठी माणूस असणे, याशिवाय अभिमानाची बाब दुसरी काय असणार!

औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. आपले अनेक मराठी तरुण-तरुणी आज मराठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा, असे राज यांनी ट्विटवरून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तब्बल ११२ वर्षे जुने असे हार्वर्ड बिझनेस स्कूल असून या संस्थेचे श्रीकांत दातार हे सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत. तर, ते हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ११ वे डीन असणार.

 अशी माहिती हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॅरी बोको यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून श्रीकांत दातार यांचा फोटो शेअर करत एक पत्रही लिहिले आहे. आपल्या निवडीने मला व तमाम मराठी जनांना अत्यानंद झाल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER