मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा – राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई :- मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी दिनाच्या शुभेच्छा ट्विटरवरून पाठवल्या आहेत. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा ! अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. १९८७ साली शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला.

राज ठाकरे यांनी कवी कुसिमाग्रजांनाही आदरांजली वाहिली आहे. कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. असे राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी आज मराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : मुख्यमंत्री


Web Title : MNS Raj Thackeray Wishesh Maharashtra Marathi Divas

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)