राज ठाकरे लवकरच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडतील

Raj Thackeray

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) स्थगिती दिल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न कमी पडल्याचे म्हटले आहे, तर कोणी केंद्र सरकारकडेही बोट दाखवले आहे. छत्रपतींचे वंशज संभाजी राजे, उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

त्यानंतर आता राज्यात उद्धव ठाकरे सत्तास्थानी असले तरी आपल्या समस्या घेऊन अनेकजण राज ठाकरेंकडे जात असतात आणि राज यांच्या भूमिकेने अनेकांचे प्रश्नदेखील सुटले आहेत. ते राज ठाकरे आता लवकरच मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडणार असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.

शिवसेनेला वचननाम्याची आठवण करून देण्यासाठी ठाणे महानगर पालिकेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (१७ सप्टेंबर ) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा उपोषण करू असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. तसेच आम्ही मराठा क्रांती मोर्चासोबत आहो. मराठा क्रांती मोर्चाच्या मागे मनसे खंबीर उभी असून थोड्याच दिवसांत मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे आपली भूमिका मांडतील असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

ठाण्यात शिवसेना मनसे वाद पुन्हा पेटणार –

ठाणे महानगर पालिकेने दिलेली आश्वासनं पुर्ण न केल्याने मनसेने आंदोलनाचा जेंडा हाती घेतला आहे. क्या हुआ तेरा वादा असे फलक घेऊन मनसे आंदोलन करत आहे. शिवसेनेने दिलेल्या वाद्यातील एकही गोष्ट साडेतीन वर्षांत पूर्ण केली नाही. जोपर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शिवसेनेने नवीन आश्वासने देऊ नये आणि दिल्यास मी उपोषणाला बसेन” असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

तसेच, जाधव म्हणाले, क्या हूआ तेरा वादा” हा आमचा बॅनर सात दिवसांपूर्वीच फेसबूकवर आला आहे. सत्तेत असमारे लेक काही बोलत नाही म्हणून मनसेला पुढाकार घ्यावा लागतो. मनसे हा एकमेव पक्ष आहे ज्याने विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर देखील टोलमुक्तीसाठी आंदोलन केलं आहे. कोरोनाच्या या संकट काळातही मनसेचा प्रत्येक पदाधिकारी काम करत आहे.

तसेच, ठाणेकर भूलथापांना आता बळी पडणार नाही. ठाणेकरांचा आवाज म्हणून आम्ही प्रत्येकवेळी येत राहू, जुन्या इमारतीतील हजारो लोक घराबाहेर आहेत त्यांच्यासाठीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार असून याची सुरुवात झाली असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

पुढच्या आठवड्यात २०१७ प्रमाणे २०१२ रोजी शिवसेने दिलेल्या वचननाम्याचा पंचनामा करणार आहे. असेही जाधव यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER